अण्णासाहेब पी. के. पाटील

अण्णासाहेबांनी सातपुडा परिसरात जी क्रांती घडवून आणली व ज्यामूळे हा सातपुडा परिसर सुजलाम सुफलाम झाला त्या संस्थेचे नांव सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना लि. पुरुषोत्तमनगर आहे. या कारखान्यात व इतर शाखांमध्ये शेकडो आदिवासी बांधवांना रोजगार मिळालेला आहे. शिवाय अण्णासाहेबांनी सुरु केलेल्या विवीध विद्याशाखांमध्ये शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. अण्णासाहेबांनी धुळे येथील जवाहर सुतगिरणीत शेकडो आदिवासी बांधवांना शेअर होल्डर बनविले. त्यांनी स्वत: परिसरातील शेतक-यांच्या हितासाठी सुतगिरणीची स्थापणा केली. याचाही फायदा आदिवासींना रोजगार मिळवून देण्यासाठी झाला.
मा. अण्णासाहेब यांनी मा. महाराज व मा. तुकारामभाई यांच्या सहकार्याने आदिवासी समाजात जागृती घडवून आणली. या सर्व शाखांमूळे आदिवासी शेतक-यांनी विवीध सिंचन पध्दतींचा अवलंब करुन बारमाही शेती करुन आपले जीवनमान उंचावले. कारखान्याच्या मदतीने ज्या गरीब शेतक-याकडे जमीन कसण्यासाठी दोन बैल नव्हते, आज त्यांच्याकडे आज ट्रॅक्टर आहे ज्याला कामाची हमी देखील कारखानाच देत आहे.
त्यांची इच्छा आहे की सातपुड्यातील द-या खो-यात व टेकड्यांवर राहणा-या आदिवासी बांधवांनी वस्ती करुन गावांत एकत्रीतपणे राहिले पाहिजे जेणेंकरून त्यांना त्या सर्व भौतीक सुविधा उपलब्ध व्हाव्यात ज्या फक्त गावातच मिळू शकतात. यासाठी त्यांनी व मा.महाराजांनी खुप प्रयत्न केले परंतू त्यांना त्या अंशी यश मिळाले नाही.
अण्णासाहेबांना अनेक पुरस्कारांनी सम्मानित केलेले आहे परंतू माझ्या कायम स्मरणात राहिला आहे तो म्हणजे श्री महाराज जनार्दन पोह-या वळवी प्रतिष्ठान, धडगांव द्वारा दिला गेलेला प्रतिष्ठीत ‘शिक्षण पुरस्कार ’. आजही मा. महाराजांसाठी अण्णासाहेबांचा मदतीचा हात सदैव पुढे सरसावलेला असतो.
Comments
Also, thank you for allowing me to comment!
my weblog :: great home ideas
Glance complex to far added agreeable from you! However, how could we keep in touch?
Also visit my site: top diets for women over 40