बालपण व शिक्षण


मा.जनार्दन पोहऱ्या वळवी यांचा जन्म १६ जानेवारी १९२४ रोजी अक्राणी तालुक्यातील मुंदलवड या गावी झाला. त्यांचे शिक्षण गावातील ख्रिश्चन मिशनरीजच्या प्राथमिक शाळेत इ.३ री पर्यंत झाले. नंतर त्यांनी धडगांव येथे ४ थी पावेतो शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना एका व्हॅक्सीनेटरने रस्ता दाखविल्याबद्दल तु तळोद्याला आलास तर तुला शिक्षण घेता येईल असे मार्गदर्शन केले. म्हणून त्यांनी तळोद्याला जाण्याचे ठरविले. घरची परिस्थीती बेताची व अशिक्षीत बांधव व पालक यांनी नकार दिला, परंतु आईने आशिर्वाद दिला व सोबत दोन आणे दिले. मनाचा दृढ निश्चय करुन त्यांनी बाजाराला जाणाऱ्या लोकांसमवेत घनदाट अरण्यातून तळोद्याचा प्रवास केला. तेथे श्री.रणछोडदास गुरुजींनी त्यांना प्रवेश दिला परंतु १०० रु. अमानत म्हणून देण्यास सांगितले. परंतु पैसे नसल्याने पंचाईत झाली. त्यानंतर त्यांच्याकडून लेखी लिहून घेतले. अशा प्रकारे तेथे त्यांचे सातवी पावेतो शिक्षण झाले. त्यापुर्वी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात, १९४२ च्या चळवळीत भाग घेतला व त्यामुळे ते नापास झाले व १९४३ ला पुन्हा परिक्षेस बसून ते फायनल म्हणजेच सातवी पास झाले. त्यानंतर त्यांना पुढे शेतकी शाळेत शिकण्यासाठी नळगव्हाण येथील कै. दिगंबरराव पाडवी यांचे वडील नरसई छोटू पाडवी यांनी धुळ्याला पाठविले. तेथे बोर्डींगमध्ये जेवणाचा जादा खर्च वसुल केला जाई. पैसे नसल्याने जनार्दन महाराजांनी चार दिवस उपवास केला. त्यावेळी मा. शंकर विनायक ठकार यांनी ४० रु. मदत केली. मदत करतांना त्यांनी एक अट टाकली की, जेव्हा त्यांना नोकरी लागेल तेव्हा ते नोकरीचे पत्र घेऊन भेटायला यावे.
अटीप्रमाणे सहाय्य्क कृषी अधिकारीच्या नोकरीची आर्डर घेऊन जनार्दन महाराज मा. नानासाहेब ठकार यांना भेटायला गेले. त्यावेळी नानासाहेब ठकारांनी जो उपदेश केला त्यामूळे त्यांच्या संपुर्ण जीवनाला एक वेगळे वळण प्राप्त झाले. त्यांनी सांगीतले की, “ तर आता तु सरकारी नोकरी करणार, संसार करणार, पेन्शन घेणार व सुखाने जगणार परंतु, या सातपुड्यात तुझे हे बांधव असेच हाल अपेष्ठा सहन करीत राहणार. त्यांच्यासाठी तु काही करणार की नाही?” श्री.जनार्दन वळवी यांनी त्याच क्षणी ठरवीले की, तहहयात सरकारी नोकरी करणार नाही, समाजसेवा करीन. पैशासाठी कोणताही जोडधंदा करणार नाही. अशा प्रकारे त्यांनी आपल्या समाजकार्याची सुरवात केली.
सन १९५२ ला नानासाहेब ठकार यांच्या उपस्थीतीत धडगांव येथे जाहीर सभेत समाजसेवेचा संकल्प केला. त्या संकल्पाला पाईक राहून ते आज वयाच्या ८४ व्या वर्षीही समाजकार्य करीत आहेत.

मा. जनार्दन वळवी यांच्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास ‘जनार्दन महाराज’ या Lable मधील इतर Links वर click करा.

Comments

Dr.Nilieshakpadvi said…
I'm very happy to read the great people who worked & still working for all communities,you are given those people's information.Keep it up.

Popular posts from this blog

Birsa Munda

Digambarrao Padvi, a Tribal Leader

Festivals of Adivasis