Posts

Showing posts with the label मा.जनार्दन महाराज

मोलगी येथील वसाहत

Image
सातपुडा हा आज अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. ज्याला कुणालाही समाजसेवा करायची असेल त्यांच्यासाठी तर हे नंदनवनच आहे. कारण येथे समाजसेवेसाठी खुपच वाव आहे. येथे समस्यांची उणीव नाही. फक्त निस्पृहपणे कार्य करणारा पाहीजे. मा. जनार्दन महाराज यांनी पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ, नंदुरबार चे अध्यक्ष व आदिवासी नेते मा.जयवंतराव नटावदकर यांच्या सहकार्याने मोलगी या गावी सातपुड्यातील पहिली आश्रमशाळा सुरु केली. आश्रमशाळेसाठी विद्यार्थी मिळत नव्हते कारण पुर्वी शिक्षणाबद्दल लोकांमध्ये आज आहे तेवढी आस्था नव्हती. तेव्हा मा. जनार्दन महाराज यांनी घरोघरी फिरुन पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन विद्यार्थी गोळा केले. आश्रमशाळेसाठी सुरवातीला दोन कौलारु छप्परे बांधून घेतली नंतर संस्थेच्या मालकीची पक्की इमारत बांधली. विद्यार्थ्यांची शाळेतील गैरहजेरी कमी व्हावी यासाठी पालकांवर वेळप्रसंगी कायदेशीर नोटीस पाठवून कार्यावाही केली. आज आपल्याला जी मोलगी दिसते ती आधी तशी नव्हती. आठ-दहा कौलारु छप्परांशिवाय तेथे काहीही नव्हते. दळणवळणाची सोय नव्हती म्हणून सरकारी कर्मचारी येत नसे. सन १९५९-६० मध्ये मोलगी भागासाठीचे...

राजकिय जीवन

Image
समाजसेवेची शपथ घेतल्यानंतर सन १९४५ साली मा. जनार्दन महाराज यांनी दरमहा रु.१० या नाममात्र मानधनावर पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ संचलित धडगांव येथील कन्झ्यूमर स्टोअर चालविले. या कन्झ्यूमर स्टोअरमध्ये किराणा, कपडे, विणकामासाठीचे सूत व इतर सर्व संसारोपयोगी वस्तु विकल्या जात. तेथे काम करीत असतांना त्यांची लोकप्रीयता वाढली आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सन १९५२ च्या पहिल्याच विधानसभेसाठी त्यांना कॉंग्रेस पक्षातर्फे आमदारकीसाठी तिकीट मिळाले. घवघवीत मतांनी ते विधानसभेवर अक्राणीचे पहिले आमदार म्हणून निवडून आले. आमदार म्हणून त्यांची कर्तव्ये त्यांनी चोख बजावली. आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी विधानसभेत केले. तेथे त्यांनी अनेक प्रश्नांना हात घातला. सातपुड्यात स्वतः पायी फिरुन कार्य करीत असल्याने आदिवासींच्या अडचणींची त्यांना पुरेपुर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी संबंधीत मंत्र्यांना अनेकदा धारेवर धरले व निरुत्तर केले. महु व टोळंबीच्या झाडांच्या कत्तलींचा किस्सा सर्वश्रूत आहे. आदिवासी समाजातील लोक महुपासून दारु बनवितात व चोरटी विक्री करतात असा आरोप करुन सरकारने सातपुड्य...

बालपण व शिक्षण

Image
मा.जनार्दन पोहऱ्या वळवी यांचा जन्म १६ जानेवारी १९२४ रोजी अक्राणी तालुक्यातील मुंदलवड या गावी झाला. त्यांचे शिक्षण गावातील ख्रिश्चन मिशनरीजच्या प्राथमिक शाळेत इ.३ री पर्यंत झाले. नंतर त्यांनी धडगांव येथे ४ थी पावेतो शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना एका व्हॅक्सीनेटरने रस्ता दाखविल्याबद्दल तु तळोद्याला आलास तर तुला शिक्षण घेता येईल असे मार्गदर्शन केले. म्हणून त्यांनी तळोद्याला जाण्याचे ठरविले. घरची परिस्थीती बेताची व अशिक्षीत बांधव व पालक यांनी नकार दिला, परंतु आईने आशिर्वाद दिला व सोबत दोन आणे दिले. मनाचा दृढ निश्चय करुन त्यांनी बाजाराला जाणाऱ्या लोकांसमवेत घनदाट अरण्यातून तळोद्याचा प्रवास केला. तेथे श्री.रणछोडदास गुरुजींनी त्यांना प्रवेश दिला परंतु १०० रु. अमानत म्हणून देण्यास सांगितले. परंतु पैसे नसल्याने पंचाईत झाली. त्यानंतर त्यांच्याकडून लेखी लिहून घेतले. अशा प्रकारे तेथे त्यांचे सातवी पावेतो शिक्षण झाले. त्यापुर्वी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात, १९४२ च्या चळवळीत भाग घेतला व त्यामुळे ते नापास झाले व १९४३ ला पुन्हा परिक्षेस बसून ते फायनल म्हणजेच सातवी पास झाले. त्यानंतर त्यांना पुढे शेतकी...

The Father of Tribal Education in Satpuda

Image
“Education would be much more effective if its purpose was to ensure that by the time they leave school every boy and girl should know how much they do not know, and be imbued with a lifelong desire to know it.” It is well said by William Haley. In Satpuda Ranges people were afraid of the people wearing trousers and shirts. During the British rule tribal were exploited too much. The Adivasi leader and Social worker, Mr. Janardan Poharya Valvi has seen his father carrying a British officer on his shoulders like a horse and was being beaten with a whip. At that very moment he decided that he will not tolerate this. He decided to learn and make his people educated. In his house nobody was ready to send him in the school. But he himself left the home taking blessings of his Mother. When he came at Taloda the superitendent of the boarding demanded 100 Rs as security deposit because the pupils from Satpuda used to run away from the boarding. He assured the superitendent but he wouldnot liste...