श्री तुकारामभाई पाटील

मा. तुकारामभाई रामदास पाटील ( जन्म – 1930 मध्ये लोणखेडा येथे मामांच्या घरी )
आदिवासी समाजात रुळलेल्या व सर्वांना प्रिय असलेल्या बिगर आदिवासी नेत्यांमध्ये मा. तुकारामभाई रामदास पाटील यांचा अव्वल क्रमांक लागतो. सर्वांना हवेहवेसे वाटणारे, अडल्या-नडल्याला ऐनवेळी कामास येणारे काकासाहेब तुकारामभाई यांचे व्यक्तीमत्व सातपुड्याएवढेच उत्तुंग व तापीसारखे निर्मळ आहे.
मा. तुकारामभाई यांचा जन्म लेवा पाटीदार गुर्जर समाजात झाला. तरीही त्यांनी आदिवासी समाजासाठी जे कार्य केले ते केवळ उल्लेखनिय नव्हे तर वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी १९५० साली Inter Arts ची परिक्षा अमळनेर कॉलेजमधून पास झाले. कॉलेजला असतांना त्यांनी कमवा व शिका नुसार सुटीत ८० रु. महिना प्रमाणे दुष्काळी कामे करुन पैसे कमविले व शिक्षण केले. पुढे १९५३ साली वडीलांच्या मृत्यूनंतर आपल्या आईच्या इच्छेनुसार शिक्षण अर्ध्यातच सोडून लहान भावंडांची काळजी घेण्यासाठी ते घरी परतले.
त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात स्वत:च्या गावापासून सरपंचपदाने केली. त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा आढावा खालिल प्रमाणे.
· सरपंच – पिंगाणे, (कालावधी - १० वर्षे)
· चेअरमन – विविध कार्यकारी सोसायटी, पिंगाणे (कालावधी - १० वर्षे)
· सचिव - दरा जंगल कामगार सहकारी सोसा. लि. (कालावधी – १९५५ ते १९६८)
सचिव असतांना हंगामात अतिरिक्त धान्य खरेदी करुन अडचणीच्यावेळी सभासदांना उसणवार दिले व पुढच्या हंगामात परत केले जाई. अशाप्रकारे धान्य बँक योजना खाजगीरित्या यशस्वीपणे राबविली.
· संचालक - पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ, नंदुरबार (कालावधी – १९५९ ते ७५)
१९५९ साली मा.खासदार जयवंतराव नटावदकर यांनी कोचरा येथील आश्रमशाळा बांधण्याची जबाबदारी दिली. फक्त ६ महिन्यात इमारत बांधकाम पूर्ण केले. जयवंतरावांचा विश्वास बसला आणि ते या मंडळाचे संचालक बनले. तसेच नंतरच्या काळात संस्थेला आर्थिक अडचण आल्याने तत्कालीन अध्यक्ष मा. जयवंतराव नटावदकर यांनी सर्व संचालकांची बैठक घेऊन संस्थेसाठी धान्य गोळा करावयाचे आवाहन केले. त्यावेळी कन्साई ते चांदसैली या भागातील शेतक-यांना भेटून त्यांना कोचरा आश्रमशाळेसाठी धान्य द्यावे अशी विनंती केली. यादीत दिल्याप्रमाणे सर्वांनी स्वत:च्या बैलगाडीतून आश्रमशाळेत एकूण ३२ माप (१०० क्विंटल) पोहचविले. आदिवासी शेतक-यांकडून कोचरा आश्रमशाळेसाठी जास्तीत जास्त धान्य मिळवून देणारे एकमेव संचालक म्हणून त्यांचे कौतूक करण्यात आले.
· संस्थापक संचालक – श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना लि. पुरुषोत्तमनगर (कालावधी – १९६९ ते ७२, १९७२ ते ७६ Elected Director, आज स्विकृत संचालक म्हणून २००६ ते २०११ पावेतो)
शहादा परिसरात शिक्षणाची व सहकाराची गंगा ज्या भगिरथाने आणली त्या आदरणिय अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे ते खंदे कार्यकर्ते म्हणून तुकारामभाईंचे नांव आदराने घेतले जाते.
· व्हा. चेअरमन – शहादा तालुका सहकारी दुध उत्पादक व कृषी पूरक उद्योग लि. शहादा (कालावधी – १९६९ ते ७८)
· चेअरमन – शहादा तालुका सहकारी दुध उत्पादक व कृषी पूरक उद्योग लि. शहादा (कालावधी – १९७८ ते ७९)
· व्हा. चेअरमन – शहादा तालुका सहकारी दुध उत्पादक व कृषी पूरक उद्योग लि. शहादा (कालावधी – १९८३ ते ९२)
चेअरमन असतांना त्यांनी ३५ गावांना दुध उत्पादक संस्था रजिष्टर करुन अनुदान मिळवून गायी व म्हशी मिळवून दिल्या व गोरगरीबांचे जीवनमान उंचावले.
· संचालक – लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सूतगिरणी लि. कमलनगर
(कालावधी – १९७९ ते आजतागायत)
· चेअरमन – लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सूतगिरणी लि. कमलनगर
(कालावधी –१० वर्षे)
· व्हा. चेअरमन – लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सूतगिरणी लि. कमलनगर
(कालावधी – ५ वर्षे)
· चेअरमन – शहादा तालुका संकरित बीज उत्पादन व वाहतूक सहकारी संघ,
(कालावधी – १९६९ ते ७९)
ही बंद पडलेली संस्था आदरणीय अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाने सुरु करुन शेतक-यांना National Seeds Corporation, Delhi च्या माध्यमातून सर्व प्रकारचे उन्नत बियाणे उपलब्ध करुन दिले. शेतक-यांना रासायनिक खते, किटकनाशके, स्प्रे-पंप इ. व त्यांची दुरुस्तीची व्यवस्था करुन ही संस्था भरभराटीस आणली.
· संचालक – धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (कालावधी – ५ वर्षे)
· संचालक – जनता सहकारी बँक लि. नंदुरबार (कालावधी – ५ वर्षे)
· मानद सचिव – आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ, धडगांव
(कालावधी –१९७६ ते आजतागायत)
· आदिवासी सेवक पुरस्कार (महाराष्ट्र शासन पुरस्कृत) – २३/ २ /२००४
· व्हा. चेअरमन – पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा
(कालावधी –१९९६-९७ ते आजतागायत)
· उपाध्यक्ष व जनरल सेक्रेटरी – समस्त लेवा पाटीदार गुर्जर समाज, नंदुरबार – धुळे

Comments

Anonymous said…
Hello. This post is likeable, and your blog is very interesting, congratulations :-). I will add in my blogroll =). If possible gives a last there on my blog, it is about the Wireless, I hope you enjoy. The address is http://wireless-brasil.blogspot.com. A hug.

Popular posts from this blog

अण्णासाहेब पी. के. पाटील

Birsa Munda

Digambarrao Padvi, a Tribal Leader