श्री तुकारामभाई पाटील
मा. तुकारामभाई रामदास पाटील ( जन्म – 1930 मध्ये लोणखेडा येथे मामांच्या घरी ) आदिवासी समाजात रुळलेल्या व सर्वांना प्रिय असलेल्या बिगर आदिवासी नेत्यांमध्ये मा. तुकारामभाई रामदास पाटील यांचा अव्वल क्रमांक लागतो. सर्वांना हवेहवेसे वाटणारे, अडल्या-नडल्याला ऐनवेळी कामास येणारे काकासाहेब तुकारामभाई यांचे व्यक्तीमत्व सातपुड्याएवढेच उत्तुंग व तापीसारखे निर्मळ आहे. मा. तुकारामभाई यांचा जन्म लेवा पाटीदार गुर्जर समाजात झाला. तरीही त्यांनी आदिवासी समाजासाठी जे कार्य केले ते केवळ उल्लेखनिय नव्हे तर वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी १९५० साली Inter Arts ची परिक्षा अमळनेर कॉलेजमधून पास झाले. कॉलेजला असतांना त्यांनी कमवा व शिका नुसार सुटीत ८० रु. महिना प्रमाणे दुष्काळी कामे करुन पैसे कमविले व शिक्षण केले. पुढे १९५३ साली वडीलांच्या मृत्यूनंतर आपल्या आईच्या इच्छेनुसार शिक्षण अर्ध्यातच सोडून लहान भावंडांची काळजी घेण्यासाठी ते घरी परतले. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात स्वत:च्या गावापासून सरपंचपदाने केली. त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा आढावा खालिल प्रमाणे. · सरपंच – पिंगाणे, (कालावधी - १० वर्षे) · चेअरमन ...